पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीने बदली

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे २९सप्टेंबर २०१८ रोजी पिंपरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झाले. या दोन वर्षांच्या काळात त्यांनी स्थापत्य, वैद्यकीय, भांडार, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय आदींचा कार्यभार सांभाळला. कोरोना महामारीत आरोग्य, वैद्यकीय विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्या बदलीची चर्चा सुरु असताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली झाली आहे. पाटील यांना राज्य सरकारने बढती दिली असून त्यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य) या पदावर बदली करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे २९सप्टेंबर २०१८ रोजी पिंपरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झाले. या दोन वर्षांच्या काळात त्यांनी स्थापत्य, वैद्यकीय, भांडार, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय आदींचा कार्यभार सांभाळला. मितभाषी असलेल्या पाटील यांनी कोणत्याही वादात न पडता सर्वसमावेशक कामगिरी केली. कोरोना महामारीत आरोग्य, वैद्यकीय विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

राज्य सरकारने पाटील यांना अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी (गट-अ) या संवर्गात बढती दिली आहे. तसेच त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन वर्षांच्या कामगिरीबाबत आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली झाली असल्याने आयुक्त हार्डिकर यांच्या बदली बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.