आढळराव पाटलांचा गृहमंत्र्यांना इशारा, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

नुकतचं गोपिचंद पडळकर यांनी पोलिस प्रशासनाला गुंगारा देत सांगली येथे बैलगाडा शर्यत भरवून दाखवली. या प्रकरणाने बैलगाडा शर्यत हा आता राजकीय अस्मितेचा विषय झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिरूरचे माजी खासदार शिवसेनेचे जेष्ठ नेते आढळराव पाटील यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना बैलगाडा शर्यतीवरून अल्टिमेटम दिला आहे.

    पुणे : महाराष्ट्राचं राजकारण सध्या बैलगाडा शर्यतीवरुन पेटलेलं दिसत आहे. बैल हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुर्वीपासुनच शेती बैलावर अवलंबून होती पण आता यांत्रिकीकरण आलं आणि आपल्या शेतीमध्ये बैलाऐवजी ट्रॅक्टर काम करू लागलं. यामुळे सहाजिकचं बैलांकडे दुर्लक्ष झालं. असं असलं तरीही बैलावर प्रेम करणारे खूप शेतकरी आजही आपल्याला पहायला मिळतात.

    दरम्यान गेल्या काहीवर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्यात आली आहे. बैलागाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत. नुकतचं गोपिचंद पडळकर यांनी पोलिस प्रशासनाला गुंगारा देत सांगली येथे बैलगाडा शर्यत भरवून दाखवली. या प्रकरणाने बैलगाडा शर्यत हा आता राजकीय अस्मितेचा विषय झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिरूरचे माजी खासदार शिवसेनेचे जेष्ठ नेते आढळराव पाटील यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना बैलगाडा शर्यतीवरून अल्टिमेटम दिला आहे.

    गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातचं बैलगाडा शर्यत आयोजन करू, असंही ते म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी गृहमंत्री यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम त्यांच्याच समोर दिला आहे. आढळराव पाटलांच्या या आक्रमकतेवर आता राज्य शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    गोपिचंद पडळकरांनी शर्यत आयोजित केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बैलगाडा शर्यतीवरून राज्य सरकार पेचात अडकल्याचं पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आता या बैलगाडा शर्यतीवरून बंदी उठवावी यासाठी काय प्रयत्न करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.