शिरूर तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीवर प्रशासनाची  धडक कारवाई

शिरूर : शिरूरचे निवासी नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे यांनी तालुक्यात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे वाळू माफियांची पळता भुई थोडी झाली आहे.  शिरूरच्या महसूल पथकाने नायब तहसिलदार व्हट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडनदी पात्रातून दाणेवाडी ता.श्रीगोंदा हद्दीत अनधिकृत  वाळू उपसा करणा-या सहा बोटी फोडून वाळ माफीयांचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान केले.व्हट्टे यांच्यासह पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे येथील नागरिक कौतुक करत आहेत. 

 शनिवार दि.१ रोजी दाणेवीडी ता.श्रीगोंदा येथे घोडनदी पात्रात बोटींच्या सहाय्याने अवैध्यरित्या  वाळू उपसा होत असल्याची माहिती शिरूर तहसिलचे निवासी नायब तहसिलदार श्रीशैल्य व्हट्टे यांना समजताच त्यांनी तत्काळ मंडलाधिकारी तीर्थंगिरी गोसावी,शिरुरचे कामगार तलाठी विजय बेंडभर,उरळगावचे कामगार तलाठी ज्ञानेश्वर चौधरी,करडेचे कामगार तलाठी प्रमोद लोखंडे,पोलीस उमेश जायपत्रे व पोलीस करणसिंग जारवाल आदिंचे पथक तयार केले.  या पथकासह स्वतः नायब तहसिलदार व्हट्टे यांनी घोडनदीतील दाणेवाडी येथील  नदीपात्रात बोटीने गेले आणि तेथील  अनधिकृत वाळु उपसा करणा-या सहा बोटी फोडल्या. यात  वाळुमाफीयांचे सुमारे ३५ लाख रूपयांचे नुकसान करण्यात आले.नायब तहसिलदार व्हट्टे यांच्यासह पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधुन काैतुक होत आहे.

यापूर्वीही  केली होती धडक कारवाई

दि.२६/७/२०२० रोजी निवासी नायब तहसिलदार व्हट्टे यांना वडगावरासाई – इनामगाव रस्त्यावर अनधिकृत वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच पथकासह जाऊन मांडवगणजवळ कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेतले होते. हे ट्रक  शिरूर पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना त्यातील एक बिगर नंबरचा ट्रक अचानक नागरगाव रोडने पळून जाऊ लागला. पळून जाणारा ट्रक  पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता नायब तहसीलदार व्हट्टे यांनी पथकासह  त्यांच पाठलाग केला. काही अंतरावर त्या पळून जाणाऱ्या ट्रकला पथकाने गाठले व त्याला ट्रक थांबवण्यास सांगितले. परंतु त्या ट्रकचा चालकाने ट्रक थांबवण्यास नकार दिला.यावेळी महसूल पथकाने वाळूच्या ट्रकच्या पुढे जाऊन ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता. ट्रक चालकाने मोठ्याने ओरडून बोलला की “तुम्ही बाजुला व्हा अन्यथा ट्रक अंगावर घालण्याची धमकी देत ट्रक पळवुन नेला होता.याबाबत निवासी नायब तहसिलदार व्हट्टे यांनी शिरूर पोलीसांत तक्रार दाखल केलेली असुन शिरूर पोलीसांनी सदर ट्रक व चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी श्रावण गुपचे यांनी दिली.

अवैध्य  गाैण खनिज उत्खनन किंवा वाहतुक होत असल्याची माहिती अथवा निदर्शनास आल्यास कारवाईसाठी एकटे न जाता पथक तयार करून तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.त्यासाठी लेखी पत्र किंवा परवानगीच घेतली पाहिजे असे काही नसुन उलट माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई केली म्हणुन संबंधीत अधिकारी व पथकातील कर्मचारी यांचे काैतुकच केले पाहिजे.

-संतोषकुमार देशमुख , उपविभागिय अधिकारी,पुणे विभाग