तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर कवठे येमाईत प्रशासन अलर्ट

कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथे ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना व

कवठे येमाई :  शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथे ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना व ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. गाव कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर गावात शुकशुकाट जाणवत आहे. 

           मुंबईतून कवठे येमाईत आलेल्या ४ पैकी ३ जण कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३ जणांना पोलीस व ग्रामस्थांनी अवघ्या २ तासात सापडून आणले.  त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर मुंबईतूनच काल गावात आलेल्या एकाला त्याची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

             कवठे येमाई गावास विभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा,तहसीलदार लैला शेख,पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे,गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे व इतर अधिकाऱयांनी भेट देत स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून प्रत्येक विभागाकडून अत्यावश्यक उपाययोजना गावात लगेचच राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे.  

   कवठे येमाई गाव कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर गावात ५० शिक्षक,आशा सेविका,अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून घरागणिक सर्व्हे सुरु करण्यात आला असून काल दि. २० ला एका दिवसात २५०० नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे.त्यातील सुमारे १७ जणांना ताप सर्दी,खोकल्याची किरकोळ स्वरूपाची लक्षणे आढळली असून त्यांना ही तातडीने औषोधोपचार सूरु करण्यात आल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमनी यांनी दिली. 

        ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आज दि. २१ ला सकाळपासून सर्वत्र प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती सरपंच अरुण मुंजाळ,ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिली. 

        गावात ३ कोरोना ग्रस्त आढळल्यानंतर नागरिक ही सतर्क झाले असून पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व त्यांचे पोलीस पथक सातत्याने  कवठे येमाई गावात लक्ष ठेवून आहेत. गावात ४ पोलीस बंदोबस्तास तैनात करण्यात आले असून त्यांच्या मदतीला २० तरुनांचे गस्तीपथक ही स्थापन करण्यात आले आहे. पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे स्थानिक असल्याने गावातच रात्रंदिवस तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून सर्वांना सोबत घेत योग्य त्या उपाययोजना राबवित आहेत. पोलीस पाटील गणेश पवार,लव्हाजी सांडभोर,माजी सरपंच दीपक रत्नपारखी,कानिफनाथ हिलाळ,सागर रोहिले,अनिल रायकर,अमोल शिंदे,सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ  व स्थानिक पत्रकार रात्रंदिवस गावात नागरिकांना व रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना कोरोना संदर्भात खबरदारी घेण्याचे मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे व अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण घराबाहेर पडू नका,घरातच थांबा. आपण व आपले कुटुंब,आपला गाव या माहामारीपासून सुरक्षित ठेवा असे आवाहन करीत आहेत.