अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंदचे  आदेश

शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने हाेत आहे. राज्यातही काेराेनाचा प्रसार वेगाने हाेत असल्याने रविवारी राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश काढले हाेते. या आदेशात राज्य सरकारने स्थािनक स्वराज्य संस्थांनाही तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी साेमवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळून सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे या आदेशात नूमद केले आहे.

    पुणे: राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत आदेश साेमवारी जारी केले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
    शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने हाेत आहे. राज्यातही काेराेनाचा प्रसार वेगाने हाेत असल्याने रविवारी राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश काढले हाेते. या आदेशात राज्य सरकारने स्थािनक स्वराज्य संस्थांनाही तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी साेमवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळून सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे या आदेशात नूमद केले आहे. त्यामुळे आजपासून महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. दरम्यान हा आदेश येण्यापुर्वीच पुण्यातील सराफांच्या दुकानाबाहेर बंदचे फलक लावण्यात आले आहे.

    महत्वाचे मुद्दे
    * जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील पण सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागले.

    * जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांच्या मालकांनी आणि कामगारांनी त्वरीत लसीकरण करावे

    * ग्राहकांसोबत सामाजिक अंतर बाळगूनच बोलावे

    * दुकान मालक आणि कामगारांनी फेसशिल्डचा वापर करावा

    * बंद असलेल्या सर्व दुकान मालकांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या कामगारांचे लसीकरण करावे