10,820 children deprived of education in Mumbai; State level survey

विद्यार्थ्यांनी ज्या शाळेची निवड केली आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक अर्ज भरताना विद्यार्थ्याने दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश निश्चित करतील. या प्रणालीमुळे पालकांना आपल्या पाल्यासाठी पालिका शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.

    पुणे : महापािलकेच्या शाळांचे प्रवेश ऑनलाईन केले जाणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी https://rb.gy/duaxe9 या लिंकद्वारे प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे. काेराेनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.

    काेराेनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर गेल्यावर्षीपासून महापािलका आणि खासगी शाळांचे वर्ग हे ऑनलाईनच भरविण्यात येत आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १४ जूनपासून सुरू हाेणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण हे तुर्तास ऑनलाईन पद्धतीने हाेणार आहे. सध्या काेराेनाची दुसरी लाट ओसरत असली तरी काेराेनाचा धाेका अद्याप टळला नाही. यामुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेणे अडचणीचे वाटत आहे. या पार्श्वभूमीवर साेमवारी झालेल्या बैठकीत पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या एकूण २७३ प्राथमिक शाळांसाठी पालकांना बालवाडी ते आठवी यापैकी कोणत्याही वर्गासाठी online पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे. हा प्रवेश https://rb.gy/duaxe9 या लिंकवर जावून अर्ज भरावा लागणार आहे.

    विद्यार्थ्यांनी ज्या शाळेची निवड केली आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक अर्ज भरताना विद्यार्थ्याने दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश निश्चित करतील. या प्रणालीमुळे पालकांना आपल्या पाल्यासाठी पालिका शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.

    -पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इ-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. कोवीड परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऐपद्वारे पहिली ते आठवीचे सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडीओ इ-बुक्स, स्वाध्याय, इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

    -ऑनलाईन प्रणालीवर गेल्यानंतर पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या (वॉर्ड ऑफिस) परिसरात राहतो, तो विभाग निवडावा. त्यानंतर ज्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रवेश हवा आहे, ते क्षेत्रीय कार्यालय निवडावे. पुढे संबंधित क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळांची यादी दिसेल, आपणास ज्या शाळेत प्रवेश हवा आहे त्या शाळेची निवड करावी.