लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम

रावणगाव : देशात वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या संसर्गामुळे तसेच संंचारबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतमजुरांसह वृद्ध ,

रावणगाव : देशात वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या संसर्गामुळे तसेच संंचारबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. लॉकडाऊनमुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतमजुरांसह वृद्ध , निराधार, अंग, विधवा अशा गोरगरीबांचे उपामारीने हाल होऊ लागल्याने रावणगाव- नंदादेवी ( ता.दौंड ) ग्रामस्थांनी एकत्र येत रावणगाव- नंदादेेवी रिलीफ आर्मी नावाचा व्हाट्सअँँप ग्रुप तयार करून त्याच्या माध्यमातून पैशांसह विविध वस्तू गोळा करून ११९ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाप करण्यात आले. त्यामुळे गरजू व हातावर पोट असलेल्या कुटुंबांची उपासमार थांबण्यास मदत झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रावणगाव परिसातील गोरगरिबांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने रावणगाव येथील काही तरुणांनी एकत्र येत रावणगाव – नंदादेवी रिलीफ आर्मी नावाचा व्हाट्सअँप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये परिवहन अधिकारी, बँक अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, नर्स, शिक्षक, महसूल कर्मचारी, वकील, सामाजिक र्कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, राजकीय व्यक्ती अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाविष्ट करण्यात आले.आणि ज्याला शक्य आहे. अशा दानशूर व्यक्तींनी आपापल्या स्वेच्छेने पैशांच्या अथवा वस्तूंच्या स्वरूपात मदतीचे आवाहन करण्यात आले.