आली आली अखेर तेवीस गावे पुणे महापालिका हद्दीत ; राज्य सरकारकडून अधिसूचना, राजकीय समीकरणे बदलणार

गेल्यावर्षी राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात महापालिका हद्दीत तेवीस गावे समाविष्ट करण्याचा इरादा जाहीर केला हाेता. त्यानंतर यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, महापालिका वगळून उर्वरीत भागाचा विकास आराखडा करण्याचे काम हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) केले जात हाेते.

    पुणे : महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसुचना राज्य सरकारने बुधवारी काढली. यामुळे पुणे महापािलका ही राज्यातील सर्वांत माेठी क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गावे हद्दीत समाविष्ट केली जात असल्याने शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    गेल्यावर्षी राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात महापालिका हद्दीत तेवीस गावे समाविष्ट करण्याचा इरादा जाहीर केला हाेता. त्यानंतर यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, महापालिका वगळून उर्वरीत भागाचा विकास आराखडा करण्याचे काम हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) केले जात हाेते. या विकास आराखड्याच्या मुद्द्यामुळे ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढण्यास विलंब झाल्याचे बाेलले जात आहे. ही गावे समाविष्ट करण्याची अधिसुचना या महीन्याच्या अखेरीला काढली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात हाेती. त्यानुसार ही अधिसुचना जारी करून गावे महापािलका हद्दीत समाविष्ट केली गेली आहेत.

    महापालिका हद्दीत समाविष्ट केलेली गावे पुढील प्रमाणे : म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक , किरकटवाडी, पिसाेळी, काेंढवे – धावडे, काेपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे , हाेळकरवाडी, अाैताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळ वाडी, नांदाेशी, सणसनगर, मांगडेवाडी, िभलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, काेळेवाडी, वाघाेली.

    या तेवीस गावांचा महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने शहरातील राजकीय गणित बदलू शकते. या गावांत प्रामुख्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्राबल्य अाहे. त्याचा फायदा महापािलका निवडणुकीत हाेऊ शकताे. या गावांचा समावेश झाल्याने आता महापािलकेची प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. त्याबाबतचे आदेशही जुलै महीन्यात काढले जाण्याची शक्यता आहे. महापािलकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्याही वाढू शकते. ती साधारण १८० च्या आसपास असेल, परंतु, १८० च्या पुढे सदस्य संख्या गेल्यास एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणुक हाेईल.