शरद पवारांनतर अजित पवाराचंही राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले की…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचा मुद्दा मोठा झाला, अशी वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात वारंवार शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे.

    पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचा मुद्दा मोठा झाला, अशी वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात वारंवार शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे.

    दरम्यान त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना ‘दादा स्टाईल’मध्ये उत्तर दिलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर सवाल केला. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असंच बोलून जातात. मात्र त्याला महत्व देयची गरज नाही, असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

    काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्यावर न बोललेलं बरं, अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असा सल्ला देखील शरद पवारांनी दिला होता. त्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या गरमागरमी वाढलेली दिसत होती.

    दरम्यान, मनसे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात देखील वाद निर्माण झालीये. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावरून हा वाद सुरू आहे. संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना खुल्ल आवाहन दिलं होतं. आगमी काही महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादाला राजकीय महत्व प्राप्त झालेलं दिसतं आहे.