राष्ट्रवादीनंतर आता महापौरांनी केले भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे उदघाटन

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे उदघाटन गुरुवारी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते. उदघाटनानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, महापौरांच्या अगोदर एक दिवस राष्ट्रवादीकडून या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे उदघाटन गुरुवारी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते. उदघाटनानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, महापौरांच्या अगोदर एक दिवस राष्ट्रवादीकडून या उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम मोठ्या वेगात सुरु आहे. भक्ती शक्ती चौकात उड्डाणपूल, रोटरी मार्ग बनविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून चौकात काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. महामार्गावरील वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. आता उड्डाणपूल सुरु झाल्याने पिंपरी-चिंचवडमधून जुना पुणे मुंबई महामार्गावरून विनाअडथळा जाता येणार आहे.

या पुलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात यावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस ची मागणी होती. मात्र भाजप कडून त्या आधीच महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी च्या वतीने कालच या पुलाचे उदघाटन उरकण्यात आले. त्या नन्तर आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे- शेंडगे, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य अमित गावडे, आदी उपस्थित होते.