इंदापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी बेलवाडीत आंदोलन

    भवानीनगर: इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय रद्द झाल्याने इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बेलवाडी(या.इंदापूर) येथे पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले .

    इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाण्यासाठी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनाची घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शुभम निंबाळकर ,काकासाहेब जाधव , ओंकार जामदार,गणेश माने, मयूर जामदार, सुरज कदम, दादा यादव,कल्याण जामदार, जावेद मुलानी, धीरज निंबाळकर, उपस्थित होते. यावेळी इंदापूर तालुक्यातील विरोधकांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी सोलापूर तालुक्यातील नेत्यांमध्ये व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून इंदापूरचे पाणी योजना होऊ नये, यासाठी प्रयत्न केले, म्हणून आज ही दुर्दैवी वेळ इंदापूर तालुक्याचा शेतकरी वर्गावर आली आहे, म्हणून आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो, आगामी काळामध्ये पाण्यासाठी संघर्ष आम्ही करणार असल्याचे ॲड. निंबाळकर यांनी सांगितले.