राज्य संघटनेचे अध्यक्ष नितीन धामणे यांची मागणी भोर : राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकार दयावा अशी मागणी राज्य कृषी संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन धामणे व सचिव हरीशचंद्र

राज्य संघटनेचे अध्यक्ष नितीन धामणे यांची मागणी

भोर : राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकार दयावा अशी मागणी राज्य कृषी   संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन धामणे व सचिव हरीशचंद्र काळे यांनी मुख्यमंत्री व संबधितांकडे केली आहे. करोनाचा फटका शहराप्रमाणे ग्रामीण भागालासुद्धा बसला आहे. त्यामध्ये शेतकरी व मजूराला त्याचा त्रास अधिक झाला आहे.अनेक मजूर  रोजगार हमी कामावर जात आहेत. त्यासाठी जॉब कार्ड, मागणी अर्ज अनिवार्य आहे.  राज्यातील सर्व ग्रामसेवक जॉब कार्ड, मागणी अर्ज व झालेल्या कामांच्या  नियंत्रण   करीत आहेत. मात्र त्यासाठी लागणारा तांत्रिक अधिकार नसल्याने त्यांना तांत्रिक अधिका-यांवर अवलंबून राहावे लागते.   तांत्रिक अधिकाऱ्यांना अनेक ठीकाणची   कामे असतात. त्यामुळे   मजुरांना कामाचे  पैसे मिळण्यास  विलंब होण्याचे प्रकार घडतात. कृषी पदवीधर ग्रामसेवकांकडे तांत्रिक पदवी असताना त्यांना कामाचे मोजमाप, मूल्यांकन करण्याचा अधिकार नाही. याउलट वनविभाग, कृषी विभाग या विभागातील कर्मचारी स्वतःच्या गावातील शेततळी, वनतळी, समतल चर आदी कामांचे मुल्यांकन स्वतः करतात, त्याचधर्तीवर राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकार दिल्यास कामाचे मोजमाप, मूल्यांकन करताना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे मजुरांना वेळेत मजूरी मिळेल.राज्यात अशा पदवीधर ग्रामसेवकांची संख्या साडेचार हजार आहे. सरकारची आर्थिक बचत होईल असे धामणे यांनी म्हणटले आहे.निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व रोहयोमंत्री यांना दिल्या आहेत.