Greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Krantisurya Mahatma Phule Memorial Day

अनेक शेतकरी संघटनांनी याला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह (ncp) अन्य अनेक राजकीय पक्षांचा देखील या विधेयकांना विरोध आहे. ही विधेयके लागू करण्यासाठी एवढी घाई कशासाठी, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केला.

  • अभ्यास करून अंतिम निर्णय घेणार
  • एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्या काँग्रेस जमवणार : बाळासाहेब थोरात

पुणे : कामगार (Workers) तसेच कृषी सुधारणा विधेयक (Agricultural Reform Bill) शेतकऱ्यांच्या हिताचे (Interests of farmers) नाही. शेतकऱ्यांना ते योग्य वाटत नाही. अनेक शेतकरी संघटनांनी याला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह (ncp) अन्य अनेक राजकीय पक्षांचा देखील या विधेयकांना विरोध आहे. ही विधेयके लागू करण्यासाठी एवढी घाई कशासाठी, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. संसदेने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकांची अंमलबजावणी महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यास आमचा विरोध (objection) असेल असे पवार यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतींसाठी खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पवारांनी शुक्रवारी पुण्यात केले. त्यानंतर ते बोलत होते. पवार म्हणाले, केंद्राचे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. परिणामी या विधेयकाची अंमलबजावणी राज्यात करण्यास आमचा विरोध आहे. परंतु, संसदेच्या विधेयकांची अंमलबजावणी न केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या निर्णयाविरोधात कोणी न्यायालयात गेले तर काय होऊ शकते, याचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

नवरात्र-गरबा यंदा घरीच?

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नसला तरी कार्यकर्त्यांमुळे कोरोनाचा प्रसार झाला, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आता नवरात्र, दिवाळी सारखे मोठे सण येत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता धार्मिक स्थळे उघडण्याची घाई सध्या तरी केली जाणार नाही.

निर्णय एकत्रितपणे घेऊ

केंद्र सरकारने संसदेत बहुमताच्या जोरावर संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली. राज्यात हे शेतकरी विरोधी कायदे लागू न करण्याचा निर्णय आम्ही एकत्रितपणे घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश प्रभारी एच. के. पाटील हे नियुक्तीनंतर प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एच. के. पाटील यांनी काँग्रेसच्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाबाबत माहिती दिली. केवळ बड्या उद्योग कंपन्या आणि परदेशी कंपन्यांसोबतच चर्चा करून भाजप सरकारने विधेयके संमत केल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्या काँग्रेस जमवणार : बाळासाहेब थोरात

नव्या कृषी सुधारणा विधेयकांविरोधात प्रदेश काँग्रेस महिनाभर मोहीम चालविणार असून एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्या जमा करणार असल्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी केली. २८ सप्टेंबरला काँग्रेस नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतील. तर, त्यापूर्वी २६ सप्टेंबरपासून ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ अशी ऑनलाइन मोहीम चालू केली जाईल.