”एक डोळा ऊस पद्धती”वर कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाघोली : (ता. हवेली) महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे फळबाग लावगड व एक डोळा ऊस लागवड पद्धत या विषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

 कार्यक्रमात बहुसंख्य शेतकरी सहभागी

वाघोली : (ता. हवेली) महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे फळबाग लावगड व एक डोळा ऊस लागवड पद्धत या विषयी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
 
कृषी पर्यवेक्षक सुरवसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी लागणारे निकष, फळबाग लागवडीचे महत्व व एक डोळा पद्धतीने ऊस लागवड करून एकरी शंभर टन उत्पादन कसे घ्यायचे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पांतर्गत बी.बी.एफ. पेरणी यंत्राच्या सहाय्याने बाजरी पिकाची पेरणी कशी करायची यासंदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर बांधावर नारळाची लागवड विषयी माहिती देऊन त्याबाबतचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमामध्ये मोठ्यासंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.  
 
कृषीमित्र रामदास सातव मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती प्रकारात एक डोळा पद्धत अवलंबून योगेश (बंटी) आव्हाळे यांच्या शेतात उसाची लागवड करण्यात आली. दरम्यान कृषीमित्र गटाने शेतात जाऊन पाहणी केली आणि लागवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सत्यजित शितोळे, कृषी पर्यवेक्षक जी. एम. सुरवसे, कृषी सहाय्यक रुपाली भोसले, गटाची संचालक व ग्रामपंचायत सदस्य आव्हाळवाडी शरद आव्हाळे, कृषीमित्र गटाचे अध्यक्ष दिगंबर आव्हाळे, सचिव रमेश आव्हाळे, कृषीमित्र गटाचे रामदास सातव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.