बारा सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह करण्यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना पुन्हा भेटणार

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले. त्यावर अजीत पवार म्हणाले की, राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत.

    पुणे : राज्य सरकार माझ्याकडे १२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते  शरद रणपिसे यांना स्वातंत्र्यदिनी केला होता. त्यानंतर आताराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करताना मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

     राज्यपालांवर बोलण्याचा अधिकार नाही