ajit pawar

पुण्यातील कोरोनासंदर्भातील एका बैठकीबाबतही हाच प्रकार पाहायला मिळाला. पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. आज (रविवारी) आयोजित कऱण्यात आलेल्या या बैठकीला अजित पवार वेळेआधीच दाखल झाले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. या बैठकीला येणाऱ्या आमदार आणि खासदारांनाही आपला वेग वाढवावा लागला आणि वेळेत उपस्थित राहण्यासाठी जोरदार धावाधाव करावी लागली. 

    राजकारणी म्हटला की तो ठरलेली वेळ पाळणार नाही आणि शक्यतो उशिराच येणार, असं सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतं. मात्र काही राजकारणी याला अपवाद असतात. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. सकाळी लवकर उठण्यापासून ते प्रत्येक कार्यक्रमाला वेळेत हजर राहण्यापर्यंतचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

    पुण्यातील कोरोनासंदर्भातील एका बैठकीबाबतही हाच प्रकार पाहायला मिळाला. पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. आज (रविवारी) आयोजित कऱण्यात आलेल्या या बैठकीला अजित पवार वेळेआधीच दाखल झाले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. या बैठकीला येणाऱ्या आमदार आणि खासदारांनाही आपला वेग वाढवावा लागला आणि वेळेत उपस्थित राहण्यासाठी जोरदार धावाधाव करावी लागली.

    गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि इतर स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित आहेत.

    या बैठकीत पुण्याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्यात अंशतः लॉकडाऊन करण्यात येऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट उभं राहणार का, याचीही पुणेकरांना धुकधुक आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.