अच्छे दिन आनेवाले है, कोरोनामुळे जनता त्रासली..; अजित पवारांची मोदी सरकारवर टीका

 अजित पावर यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही. 

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. अच्छे दिन आनेवाले है, म्हणून लोकांनी या सरकारला निवडून दिले. मात्र कोरोनामुळे जनता त्रासली आहे. केंद्र सरकारने त्यात लक्ष देऊन इंधनाचे दर कंट्रोल मध्ये ठेवले पाहिजेत, असे म्हणत अजित पवार यांनी टीका केली आहे.

    अजित पावर यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही.

    शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले. पण चर्चा होताना दिसत नाही. आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे. असं अजित पवार म्हणाले.