बहिणींच्या नावावर अजित पवारांची संपत्ती; किरीट सोमय्यांनी डायरेक्ट कागदपत्र दाखवत केला गंभीर आरोप

जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या(Ajit Pawar's property in the name of sisters; Kirit Somaiya showed the documents).

  पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या(Ajit Pawar’s property in the name of sisters; Kirit Somaiya showed the documents).

  पदाचा दुरुपयोग केला

  मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलिस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

  ‘खरं खोटे काय स्पष्ट करा’

  गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. त्यावेळी पहिल्या दिवशी अजित पवार यांनी खूप मोठे भावूक वक्तव्य केले की फक्त रक्ताचे नाते म्हणून बहिणींच्या घरावर धाडी टाकल्या. जरंडेश्वर साखर कारखान्याचा जो मालक आहे, मुख्य भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील ते विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील. हे लोक कोण आहेत? आता खरे खोटे काय आहे ते पवारांनी स्पष्ट करावे असे किरीट सोमय्या म्हणाले.

  बेनामी कंपन्यांमध्ये भागीदारही

  दरम्यान, हे फक्त जरंडेश्वर पुरते मर्यादित नाही. विजय पाटील, मोहन पाटील, निता पाटील यांच्या अनेक कंपन्या आहे. त्यांनी प्रमुख कंपनी आहे कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ती अजित पवारांच्या अनेक नामी-बेनामी कंपन्यामध्ये पार्टनर आहे. आता बेनामी कंपन्यांसाठी अजित पवार बहिणींच्या नावाचा उपयोग करत असतील तर दुर्दैवी गोष्ट आहे.

  …तर निश्चितच रॉयल्टी मिळेल

  अजित पवार आणि कंपनीवर आयकर विभागाचा देशातील सर्वात मोठा छापा सुरु आहे. सात दिवस झाले ही छापेमारी सुरु आहे. 24 पेक्षा जास्त प्रमोटर्स, डिरेक्टर्स, ओनर्स, कंपन्या, प्रकल्पांपर्यंत ते गेले आहेत. कुठे भिंतीचा आज लॉकर होते त्यातून काहीतरी सापडते आहे. तर कुठे बेसमेंट, पार्किंग प्लॉट, सर्व्हर रुममध्ये काही तरी सापडत आहे. नेटफ्लिक्सने जर सिरीयल बनवायची ठरवली तर अजित पवारांना किमान 200 ते 400 कोटी रॉयल्टी मिळू शकेल, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.