अजित पवारांची भल्या पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी धडक; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भल्या पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास पुण्यातील मेट्रोच्या कामाच्या कामाची ( Pune Metro inspection ) पाहणी केली. त्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

 पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भल्या पहाटे पावणे सहा वाजताच्या सुमारास पुण्यातील मेट्रोच्या कामाच्या कामाची ( Pune Metro inspection ) पाहणी केली. त्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) येथे पहाटे सहा वाजताच्या सुमारास मेट्रो कामाची पाहणी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती करत आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली आहे.

तसेच, सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही, असे असताना या कामाला गती कशी देता येईल याविषयीची चर्चा अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत केल्याचे समजते.

पुणे मेट्रोच्या पुणे स्टेशन, वनाज डेपो व शिवाजीनगर येथील सुरु असणाऱ्या कामांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून भेट देत पाहणी केली, यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.