मामाच्या साखर कारखान्यावर ED ची कारवाई, अजित पवार म्हणाले की…

रंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या करावाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

  पुणे : जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या करावाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरंडेश्ववर कारखाना माझ्याच नातेवाईकांचा आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वरद्वारे न्यायालयासाठी अपील केले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मामाच्या साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

  अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

  दरम्यान या कारखान्याच्या खरेदी-विक्रीसह कारखान्याच्या नफ्या-तोट्याचीही माहिती दिली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजितदादा म्हणाले.

  तसेचं जरंडेश्वर कारखान्यावर टाच आली हे खरे आहे. मला कारखान्यावर कारवाई झाल्याचं मला माहीत नव्हतं. रात्री मला माहीत झालं. हा कारखाना माझ्या नातेवाईकाचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. कायदेशीर प्रक्रिया राबवूनच या कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी टेंडरही काढण्यात आलं होतं.  बोली लागल्यानंतरच कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी गुरु कमोडिटी या कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

  चौकशी पारदर्शक व्हावी – पवार

  दरम्यान, सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव भाजपने केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीबीआय चौकशीचा असा ठराव करता येतो का? स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदा घडलंय. मात्र, कुठल्याही पक्षाला ते अधिकार आहेत. फक्त चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, यामागचं गौडबंगाल काय आहे जनतेला माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.