…अखेर अक्षय बोऱ्हाडे यांचे मारहाण प्रकरण मिटले

नारायणगाव : मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर गाजत असलेल्या शिरोली बुद्रुक ( ता. जुन्नर ) येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शिवऋण संस्थेच्या अक्षय बोऱ्हाडे यास तथाकथीत मारहाण प्रकरण आज ता. ३१ रोजी ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटले.

 नारायणगाव : मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर गाजत असलेल्या शिरोली बुद्रुक ( ता. जुन्नर ) येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शिवऋण संस्थेच्या अक्षय बोऱ्हाडे यास तथाकथीत मारहाण प्रकरण आज ता. ३१ रोजी ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटले.

           शिव ऋणचे अक्षय बोहाडे याने  फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये आपणास अमानुष मारहाण झाल्याचे म्हटले होते. त्यावर राज्यभरातून त्यास अनेक शिवप्रेमींनी माध्यमातून प्रतिक्रीया देऊन पाठिंबा दर्शवला होता. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अनेक जण शिरोली बुद्रुक येथे आले होते. त्यानंतर शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा करताना मारहाणीच्या आरोपांचे खंडन केले होते. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी गावपातळीवर आम्ही खबरदारी घेत असून अक्षयच्या संस्थेत नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत असल्याचे समजल्याने त्यास ग्रामस्थांनी शेरकर यांच्या घरी समज देण्यासाठी बोलावून घेतले होते. या घटनेचा विपर्यास करून अक्षयने आपल्यावर मारहाणीचे आरोप केल्याचे शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या घटनेची दखल घेत अनेक संस्थां, राजकिय नेते, शिवप्रेमींनी अक्षय यास पाठिंबा दिला. घटना घडल्याच्या नंतर दोन दिवसांचा अवधी घेऊन बोऱ्हाडे यानेने शेरकर यांचे विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले व अक्षयला अनेकांची सहानुभुती मिळाल्याने कोरोनाच्या लॉक डाऊन मध्येही मोठ्या प्रमाणावर लोक त्यास येऊन भेटू लागले व शेरकरांवर टिका करू लागले.तद्नंत ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनापासून गावसुरक्षीत ठेवण्याच्या दृष्टीने गावात न येणेबाबत दोघांच्याही समर्थकांना आवहान केले होते.
    या घटनेत आपल्या शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास कमीटी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन त्यांच्यातिल वाद चर्चेतून सामोपचाराने मिटवला.
   यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.