शिक्रापूर रुग्णालयातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह

शिक्रापूर: शिरूर येथील मलटण फाटा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोणा मुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असताना सदर मृत इसमाची मृत्यू आधी तपासणी करणाऱ्या शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील सहा डॉक्टर व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करत चाचणी केली असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद यांनी दिली आहे.

शिक्रापूर(ता. शिरूर) येथील मलटण फाटा परिसर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता, त्यानंतर सदर इसमा सोबत राहणाऱ्या त्याच्या सासर्‍याला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले असता त्यांने रुग्णालयातून पलायन केले. एका आठवड्यात दोन वेळा सदर मृत व्यक्तीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतले होते त्यामुळे सदर मृत व्यक्तीची तपासणी करणाऱ्या सहा डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तसेच एका रुग्णवाहिकेतून सदर इसमाला ससून येथे दाखल करणाऱ्या रुग्णवाहिका चालक व डॉक्टर यांना क्वारंटाईन करत एकूण आठ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सदर अहवाल तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असताना सर्वांचे देखील अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैजिनाथ काशीद यांनी दिली आहे. तर सर्वांचे अहवाल कसे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व डॉक्टर्स व  नागरिकांना देखील एक मोठा दिलासा मिळाला आहे.