डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ; नातेवाईकांची वायसीएम रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी

दोन-तीन उपचार केले. उपचार करणार्‍या महिला डॉक्टराने पुन्हा आम्हाला तोंडही दाखविले नाही. त्यामुळे या महिला डॉक्टरकडूनच काही तरी हलगर्जीपणा झाला असून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच सपना यांना हृदयाचा आजार असून त्यांना हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले आहे. मात्र, सपना यांना हार्टचा कोणताच आजार नसल्याचे नातईवाईकांचे म्हणणे आहे.

    पिंपरी- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर गंभीर झालेल्या महिलेचा वायसीएम रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. आता महिलेचा मृत्यू झाल्यामुळे चार मुली आई-वडिलांना विना पोरक्या झाल्या आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सपना कांबळे (रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना कांबळे यांना मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी कांबळे यांच्यावर दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रिये दरम्यानच डॉक्टरांचा काहीतरी हलगर्जीपणा झाला असून त्यांचा रक्तस्त्राव झाला. सपना यांची प्रकृती अचानक बिघडल्याने आम्हाला कोणतीची कल्पना न देता वायसीएममध्ये दाखल केले.

    दोन-तीन उपचार केले. उपचार करणार्‍या महिला डॉक्टराने पुन्हा आम्हाला तोंडही दाखविले नाही. त्यामुळे या महिला डॉक्टरकडूनच काही तरी हलगर्जीपणा झाला असून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच सपना यांना हृदयाचा आजार असून त्यांना हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले आहे. मात्र, सपना यांना हार्टचा कोणताच आजार नसल्याचे नातईवाईकांचे म्हणणे आहे.

    याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे म्हणाले ’’सपना कांबळे यांना भोसरी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. तेथे त्या गंभीर झाल्या. ब्लड प्रेशर स्थिर राहत नव्हते. त्याच्या तपासण्या करण्यात आला. त्यानंतर रक्तस्राव होत आहे का? हे पाहण्यासाठी वायसीएममध्ये ओपन सर्जरी करण्यात आली. रक्तस्राव होत नसल्याचे निदर्शास आले. मात्र, त्यानंतरही त्यांची तब्येत सुधारली नाही. त्यांच्यावर दोन दिवस आयसूयीमध्ये उपचार केले. त्यांना पूर्वीचा काही तरी हृदयाचा आजार असल्याचे दिसून आले आहे. यातच त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल’’.