सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी द्या

पुणे व्यापारी महासंघाची मागणी पुणे : शहरातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने महापािलका अायुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली अाहे. पुणे व्यापारी

पुणे व्यापारी महासंघाची मागणी
पुणे :
शहरातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने महापािलका अायुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली अाहे.

पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने आयुक्त गायकवाड यांची भेट घेतली.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशांत लाॅकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला अाहे. केंद्र अािण राज्य सरकारने पाचव्या टप्प्यात लाॅकडाऊनमधील काही अटी िशथिल केल्या अाहे. अटीशर्तींवर व्यवहार सुरू करण्याच्या सुचना िदल्या अाहेत. या पार्श्वभुमीवर िशष्टमंडळाने अायुक्त गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना व्यापाऱ्यांच्या सध्याच्या हलाखीच्या परिस्तिथीिवषयी माहीती िदली. व्यापारीही सध्या भीषण आर्थिक संकटाला सामोरे जात अाहेत. सत्तर िदवसापासून शहरातील व्यापार बंद राहीला अाहे. शहराच्या मध्यवर्ती भागांत इलेक्ट्रीक, भांडी, लाकुड, लाेखंड, कापड, साेने – चांदी, अगरबत्ती, खेळणी,जुनी वाहन विक्री अशी माेठी बाजारपेठ अाहे. या बाजारातून पुणे शहरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पुरवठा केला जाताे. लाॅकडाऊनच्या कालावधीत हा पुरवठा खंडीत झाला असुन, लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात व्यापार सुरु करण्यासाठी काही उपाय याेजना कराव्यात अशी मागणी िशष्टमंडळाने केली.

काेराेनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारतच सील करावी, पुर्ण परीसर सील करू नये, त्या भागातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी िशष्टमंडळाने केली. त्यासंबधीचे निवेदनही त्यांना देण्यात आले .व्यापाऱ्यांची सद्य स्थिती माहित असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही आयुक्तांनी ह्या वेळी दिले .

ह्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका ,सचिव महेंद्र पितळीया ,उपाध्यक्ष रतन किराड ,हेमंत शहा ,नितीन काकडे ,अमृत सोळंकी ,मोहन पटेल ,भारत शाह ,निलेश फेरवानी ,बोगावत ,शिवलाल पटेल ,रवी जेठवानी ,शंकर पटेल ,ऋषी खंडेलवाल अादी उपस्थित हाेते.