काकडा आरती सुरु करण्यासाठी परवानगी द्या ; अखिल भारतीय वारकरी महामंडळाची मागणी

चाकण:  भल्या पहाटे टाळ मृदुंगाचा गजर करत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पहाटे पासून सुरु होणाऱ्या काकडा आरतीस अधिकृत परवानगी देण्याची, मागणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे जिल्हा सहअध्यक्ष हभप विजय महाराज पवार यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन पवार यांनी खेडचे तहसीलदार, लोकप्रतिनिधी व पोलीस ठाणे आदींना दिले आहे.

-शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही
कार्तिक स्नान आरंभ बुवा काकड आरती सोहळा शनिवार (दि.३१) पासून सुरु होत असून, त्याचा सांगता समारंभ सोमवारी (दि.३०) नोव्हेंबर होत आहे. वारकरी परंपरा ही सर्वात जुन्या चाली रीतीने अखंडितपणे चालू राहणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्यातील गावचे वारकरी, भाविक सर्वात जुनी परंपरा व सर्व शासकीय नियमांचे पालन करून साजरा करू इच्छित आहे. सोशल डिस्टन्स, मास्क आणि सेनेटायझरचा योग्य पद्धतीने वापर करून रोज पहाटे साडे चार ते सकाळी ७ वाजेपर्यंत काकडा होणे अपेक्षित वाटत आहे. या सोहळ्यासाठी अत्यंत मर्यादित भाविक उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्यात कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन करणार नाही. तरी प्रशासनाने वरील नियोजित दिवशी होणाऱ्या काकड आरतीस अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी हभप विजय पवार व खराबवाडी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतची लेखी निवेदने खेडचे तहसीलदार, चाकण पोलीस व महाळुंगे इंगळे पोलिसांना आदींना दिली आहेत.