बारामतीतील दुकाने १ जून पासून उघडण्यास परवानगी द्या ; व्यापारी महासंघाची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

बारामती शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने एक जून पासून उघडण्यास परवानगी द्यावी, असे नरेंद्र गुजराथी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर परवानगी दिल्यानंतर सर्व व्यापारी सर्व नियमांचे पालन करतील, अशी ग्वाही या निवेदनात उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे.

    बारामती:  बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी शासनाच्या ब्रेक द चेन या मोहिमेत तीन दोन महिन्यांपासून उस्फूर्तपणे प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली आहेत,मात्र आता व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दिनांक 1 जून पासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
    याबाबतचे निवेदन गुजराथी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.

    बारामती शहरात कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बारामती शहर व तालुक्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे. शासनाच्या ब्रेक द चेन या मोहिमेत बारामतीतील व्यापाऱ्यांनी खंबीर साथ दिलेली आहे. मात्र दोन महिने व्यवसाय पूर्ण बंद असल्याने व्यापार यांच्या अडचणी वाढल्या आहेत, कामगारांचे पगार, विज बिल, बँकांचे व्याज, टेलिफोन बिल, नगरपालिका कर, इतर कर अधिक खर्च व्यापाऱ्यांना द्यायचा आहे, मात्र बंदमुळे अनेक व्यापाऱ्यांना हा खर्च देणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने एक जून पासून उघडण्यास परवानगी द्यावी, असे नरेंद्र गुजराथी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर परवानगी दिल्यानंतर सर्व व्यापारी सर्व नियमांचे पालन करतील, अशी ग्वाही या निवेदनात उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे.