नाभिक समाजाला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या – अनिल रायकर

कवठे येमाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ३ महिन्यांपासून शिरूरच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागातील नाभिक समाजाचा व्यवसाय पूर्ण बंद असल्याने हातावरचे पोट असणा -या नाभिक समाजाला सलून दुकाने सुरु करण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी कवठे येमाई येथील नाभिक समाजातील तरुण सामाजिक कार्यकर्ते अनिल रायकर यांनी केली आहे.

       नाभिक समाजातील बहुसंख्य कुटुंबांकडे जमीन किंवा हक्काची घरे देखील नाहीत. कुटुंबांचा संपूर्ण चरितार्थ सर्वस्वी सलून व्यवसायावरच अवलंबून आहे. अनेक नाभिक कारागीर भाड्याच्या खोल्या घेऊन व्यवसाय करीत आहेत.तर व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या आमदणीतून स्वतःची जागा असणाऱ्या नाभिक कारागिरांनी बँकांची कर्जे घेऊन दुकानाचे बांधकाम केलेले असताना लॉकडाऊनमध्ये सलून व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबांचे होत असलेले हाल व बँकांचे असलेले हप्ते भरायचे कसे ? हा मोठा प्रश्न नाभिक समाजातील कारागिरांपुढे पडलेला आहे. त्यातच घरातील एखाद्याचे आजारपण, मुलांचा शैक्षणिक खर्च करायचा कसा ? हा मोठा प्रश्न सलून कारागिरांना भेडसावत आहे. त्याकरिता शासनाने ग्रामीण भागातले नाभिक,सलून कारागिरांना तात्काळ आर्थिक मदतीचा हात द्यावा अथवा सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी असे कळकळीचे आवाहन अनिल रायकर यांनी केले आहे.