
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील गिरवली व वळती गावांमध्ये मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने कोरोना बाधितांची रूग्ण संख्या बारा दिवसांमध्येच १० वर गेल्याने नागरिकांच्या चिंतेत भर
भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील गिरवली व वळती गावांमध्ये मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने कोरोना बाधितांची रूग्ण संख्या बारा दिवसांमध्येच १० वर गेल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
आंबेगाव तालुक्यात आज (दि. २७) गिरवली व वळती येथे दोन व्यक्ति कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. मुंबई येथून आलेल्या गिरवली ५० व वळती ५५ वर्षीय वयोगटातील पुरूषांचा वैदयकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. दि. १६ ला साकोरे गावात पहिला रूग्ण सापडला. त्यांनतर दि. २२ ला शिनोलीत दुसरा तर दि. २४ रोजी निरगुडसर, जवळे व शिनोली या गावांमध्ये एकाच दिवशी चार रूग्ण आढळून आले. त्यानंतर दि. २६ रोजी पिंगळवाडी (लांडेवाडी), वडगांव काशिंबेग येथे दोन रूग्ण सापडल्याने रूग्ण संख्या आठवर गेली. आणि आता गिरवली व वळती गावंामध्ये दोन व्यक्ति कोरोना बाधित भेटल्याने एकुण दहा कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.
प्रशासनाने संबंधित व्यक्तिंना तपासणीसाठी पाठविले. त्या ठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा वैदयकिय अहवाल बुधवारी आला. तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, दिपक काशिद यांनी तत्परतेने संबंधित गावांना भेटी देऊन गिरवली व वळती गावातील जा-ये करणारे रस्ते बंद केले.