आंबेगाव तालुका लवकरच  होणार कोरोनामुक्त !

१७ कोरोना बाधित गावांपैकी १३ गावे कोरोना मुक्त ४४ रुग्णांपैकी फक्त सहा व्यक्तिंवर उपचार चालू

१७ कोरोना बाधित गावांपैकी १३ गावे कोरोना मुक्त

४४ रुग्णांपैकी फक्त सहा व्यक्तिंवर उपचार चालू 

                                                                                                                                                                                                                     भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ४४ कोरोना बाधित व्यक्तिंपैकी ३७ पॉझिटीव्ह व्यक्तिंचा निगेटीव्ह आला आहे. एका व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर १७ कोरोना बाधित गावांपैकी सदयस्थितीत तेरा गावे कोरोना मुक्त झाली असुन सहा कोरोना बाधित व्यक्तिंवर उपचार चालू असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.  

तालुक्यातील पेठ, मंचर, निरगुडसर, शिनोली, साकोरे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव, जवळे, एकलहरे, वळती, फदालेवाडी/उगलेवाडी, नारोडी व अवसरी बु. ही तेरा कोरोना बाधित असलेली गावे कोरोना मुक्त झाली आहे. तर गिरवली तीन, वडगाव काशिंबेग एक, पारगाव एक व चपटेवाडी एक या विविध गावांतील सहा कोरोना बाधित व्यक्तिंवर उपचार चालू आहे. सर्वात दोन पेक्षा जास्त रूग्ण वळती, वडगाव काशिंबेग, गिरवली, पेठ, निरगुडसर, फदालेवाडी/उगलेवाडी व शिनोली या भागात सापडले आहेत.   

प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका, पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, ग्रामस्तरीय समिती आदिंनी समन्वयाने काम करून तालुका कोरोनामुक्तीकडे नेला आहे.

…………….