आंबळे रेल्वेगेट राहणार दोन महिने बंद

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणार्या आंबळे येथील सासवड ते यवत रस्ता व पुणे ते मिरज रेल्वे लाईनवर असणारे गेट नं१५ हे दोन महिने बंद राहणार आहे . सासवड ते यवत रस्ता हा खुप रहदारीचा रस्ता समजला जातों.

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील पुर्वेस असणार्या आंबळे येथील सासवड ते यवत रस्ता व पुणे ते मिरज रेल्वे लाईनवर असणारे गेट नं१५ हे दोन महिने बंद राहणार आहे . सासवड ते यवत रस्ता हा खुप रहदारीचा रस्ता समजला जातों. या रस्त्याने दौंड पुरंदर हे दोन तालुके जोडलेले आहेत यवतवरुन सासवडला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो सुट्टीच्या दिवशी माळशिरस येथे असणारे श्री क्षेत्र भुलेश्वर याठिकाणी भाविकांची जी गर्दी होते ते सर्व भाविक याच रस्त्याचा वापर करतात परंतु रेल्वे लाईनवर असणारे सर्व रेल्वेगेट हे बंद करण्यात येणार असल्याने आंबळे येथील रेल्वेगेट नं१५ हे दोन महिन्यासाठी बंद होणार आहे याठिकाणी बोगदा होणार असुन त्याकामासाठी दोन महिन्याचा वेळअपेक्षीत आहे या अगोदरही आंबळे येथील गेट नं१६ हे बंद करुन त्याठिकाणी बोगदा केलेला आहे आता प्रवाशांना पर्याय म्हणुन याच रस्त्याचा( बोगद्याचा) वापर करावा लागणार आहे तसेच अवजड वाहतुक ही पुर्णपणे बंद राहणार आहे.प्रवाशांनी अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे रेल्वे प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे.