माझा मोबाईल नंबर देऊन जातो कधीही काही वाटलं तर… अमित ठाकरेंनी घेतली स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्वप्नीलच्या आई वडिलांना दोन लाखांचा चेक देत अमित ठाकरे यांनी माझा मोबाईल नंबर देऊन जातो कधीही काही वाटले आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी आहे असे आश्वासन दिले.

    पुणे : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्वप्नीलच्या आई वडिलांना दोन लाखांचा चेक देत अमित ठाकरे यांनी माझा मोबाईल नंबर देऊन जातो कधीही काही वाटले आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी आहे असे आश्वासन दिले.

    त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना सरकार झोपले आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत पदभरती लवकारत लवकर घ्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. दुसरीकडे, अशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही भरती लवकर करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी लागू द्या हीच आमच्या स्वप्नीलसाठी श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईवडिलांनी दिली.