महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या हवेली तालुका सचिव निवडपत्र स्वीकारताना अमोल गावडे व मान्यवर.
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या हवेली तालुका सचिव निवडपत्र स्वीकारताना अमोल गावडे व मान्यवर.

वाघोली: महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या हवेली तालुका सचिवपदी श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील अमोल काशिनाथ गावडे महाराज यांची निवड पार पडली.हवेली तालुक्यामध्ये संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याची व संघटन बांधणीची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे

वाघोली: महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या हवेली तालुका सचिवपदी श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील अमोल काशिनाथ गावडे महाराज यांची निवड पार पडली.हवेली तालुक्यामध्ये संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्याची व संघटन बांधणीची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात मागील २० वर्षांपासून त्यांनी केलेल्या अनेक सामाजिक कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णाजी रांजणे,रामेश्वर महाराज शास्त्री,मराठवाडा अध्यक्ष महादेव महाराज बोराडे,संतोष महाराज पायगुडे,निवृत्ती महाराज बोरकर,पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काळजे,विभागीय अध्यक्ष जीवन खाणेकर,जालिंदर काळोखे व ग्रामस्थ उपस्थित होते.

निवड झाल्याप्रसंगी अमोल गावडे महाराज म्हणाले,आजचा युवक शारीरिक,मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा,तसेच सुसंस्कारित सदाचारी व व्यसनमुक्त व्हावा व युवकांमध्ये संत साहित्याची ओळख जागृती व आवड निर्माण व्हावी.तसेच अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे ज्ञान हे प्रत्येक तरुणांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.