कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शॉपिंग करा, अमृता फडणवीसांनी दिला पुणेकरांना असाही सल्ला…

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग (Shopping ) करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम (Handloom) हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं.

    पुणे : राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग कमी होताना दिसत आहे. ज्या शहरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) कमी आहे, तिथे राज्य सरकारने (State Government) निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र, पुण्यात (Pune) पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्यावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis)  यांनी विधान केलं असून पुणेकरांना एक खास सल्लाही दिला आहे.

    अमृता फडणवीस  यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

    पैठणीचं कारोबारही मोठा…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या, असं उद्घाटन कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.