पुण्यात दिवसभरात १२११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ ;  ४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

पुणे : कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा नियंत्रणात येताना दिसत नसून, बुधवारी शहरात ४७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्याबाहेरील १२ जणांचा समावेश आहे.शहरात बुधवारी कोरोनाचे नवीन १ हजार २११नवीन रुग्ण आढळून आले. आजपर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या ७७ हजार ३६८पर्यंत पोचली आहे. तर बुधवारी १हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत ६० हजार ९६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १४ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ८१५ रुग्ण गंभीर असुन,४८३ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत शहरात कोरोना बाधित १हजार ८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकुण बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरातील मरण पावणाऱ्या रुग्णांची टक्केवारी कमी असली तरी सध्या सरासरी प्रतिदिन ३० जणांचा मृत्यू होत आहे. हि जरी चिंतेची बाब असली तरी नवीन रुग्ण आणि कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेत कमी झाली आहे.

पुणे विभागाचा विचार करता, बुधवारी दुपारपर्यंत १ लाख २४ हजार ७५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार २५६ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४४ हजार ७५०  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ४ हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  २.७३ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७१.६  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण  १ लाख  २९ हजार ५६९  रुग्णांपैकी ९९  हजार १२४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  २७ हजार २४५ आहे. कोरोनाबाधित एकूण ३हजार २००रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण ७  हजार ९२९ रुग्णांपैकी  ४ हजार  ४४९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार  २२० आहे. कोरोनाबाधित एकूण २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १४  हजार १८६  रुग्णांपैकी ९ हजार ६००  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३  हजार ९६४ आहे. कोरोनाबाधित एकूण ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण ७ हजार  १५ रुग्णांपैकी ३  हजार ५०२ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३  हजार २८३  आहे. कोरोनाबाधित एकूण २३०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण १५  हजार ५५७  रुग्णांपैकी  ८  हजार  ८0 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार ३८  आहे. कोरोनाबाधित एकूण ४३९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  ४ हजार ६०   ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात २  हजार ५४३, सातारा जिल्ह्यात ३३६, सोलापूर जिल्ह्यात ३५७, सांगली जिल्ह्यात ४३७  तर कोल्हापूर जिल्ह्यात  ३८७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.