पुण्यात दिवसभरात १६१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

पुणे : गेले काही दिवसांच्या तुलनेत बुधवारी कोरोना बाधितांची मृत्यूसंख्या कमी झाली. शहराबाहेरील १२ रुग्णांसह ४३ जणांचा मृत्यू झाला.शहरात आजपर्यंत ८७ हजार ३१७ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७० हजार २६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सथ्या शहरात १४ हजार ९४० रुग्ण ऐक्टिव आहे. त्यापैकी८१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात १६१७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर १३६९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण २१०८ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

पुणे विभागातील १लाख ४९ हजार ५५१कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४४९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ५० हजार ३५२ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ५ हजार ५४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.७७ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७२.८ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ४९ हजार ८९७ रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ३७८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३० हजार ९१७ आहे. कोरोनाबाधित एकूण ३ हजार ६०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.४० टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ७६.९७ टक्के आहे.

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १० हजार ६५३ रुग्णांपैकी ६ हजार १६५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४ हजार १६४ आहे. कोरोनाबाधित एकूण ३२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १६ हजार ४०९ रुग्णांपैकी ११ हजार ८९१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ८३२ आहे. कोरोनाबाधित एकूण ६८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ८ हजार ८८६ रुग्णांपैकी ४ हजार ९१० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ६३१ आहे. कोरोनाबाधित एकूण ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १९ हजार ६०४ रुग्णांपैकी ११ हजार २०७रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार ८०८ आहे. कोरोनाबाधित एकूण ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ४हजार ५०१ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात २ हजार ५०५, सातारा जिल्ह्यात ४९६, सोलापूर जिल्ह्यात ३५०, सांगली जिल्ह्यात २७१ तर कोल्हापूर जिल्ह्यात ८७९अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.