पुणे शहरात काल दिवसभरात १ हजार ६५८ नव्या रूग्णांची वाढ

पुणे शहरात  (pune city) एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३० हजार ८१ झाली असून, आतापर्यंत १ लाख ९ हजार ३७१ जण कोरोनामुक्त झाले (discharge) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये (home isolation) असलेले १ हजार २४८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

 पुणे : राज्यात कोरोना रूग्णांच्या (corona virus) संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच काल दिवसभरात १ हजार ६५८ इतक्या नव्या कोरोना रूग्णांची (new corona patients)  नोंद करण्यात आली आहे. काल शनिवारी ५ हजार ९१९ जणांची कोरोना चाचणी (corona test)  करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, पुणे महापालिकेने अँटीजन चाचणीचे (Antigen test) प्रमाण कमी करून स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे शनिवारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये १ हजार ६५७ नागरिकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह (positive) आले आहेत.

पुणे शहरात  (pune city) एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३० हजार ८१ झाली असून, आतापर्यंत १ लाख ९ हजार ३७१ जण कोरोनामुक्त झाले (discharge) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये (home isolation) असलेले १ हजार २४८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

तर विविध हॉस्पिटलमध्ये ९५७ गंभीर रुग्णांवर उपचार (active patients) सुरू असून, यापैकी ४९५ व्हेंटिलेटरवर, ४६२ आयसीयूमध्ये (ICU)तर ३ हजार ५३० जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण हे पुण्याबाहेरील होते.