Antibodies in patients

शिक्रापूर : परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना शिक्रापूर परिसर हादरुन गेला होता. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असताना आज शिक्रापुर सह परिसरातील वेगवेगळ्या गावामध्ये नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.

शिक्रापूर ता. शिरुर सह आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावांमध्ये दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना त्यामध्ये शिक्रापूर ची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती, दोन दिवसात शिक्रापूर परिसरात शंभर हून अधिक रुग्ण सापडले असताना नागरिक भयभीत झाले होते तर आज शिक्रापूर येथे ४, सणसवाडी येथे १, कोरेगाव भीमा येथे २, दरेकर वाडी येथे १ तर तळेगाव ढमढेरे येथे १ अशा नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, दररोज मोठ्या प्रमाणात असताना आज दिवसभरात नऊ रुग्ण आढळल्याने शिक्रापूर व परिसराला एक चांगलाच दिलासा मिळाला आहे, तर अशाच पद्धतीने कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत जावो आणि परिसर कोरोना मुक्त होवो अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत, आज शिक्रापूर परिसरातील सदर कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक संतोष चोपडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जात ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले असून सर्व कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु केले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.