सणसवाडीत आढळला गळफास घेतलेला अनोळखी मृतदेह

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरूर येथील नरेश्वर मंदिर परिसरात एका अनोळखी इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला असल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली

शिक्रापूर  :  सणसवाडी ता. शिरूर येथील नरेश्वर मंदिर परिसरात एका अनोळखी इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील कुजलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला असल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

सणसवाडी ता. शिरूर येथील नरेश्वर मंदिर परिसरात काही नागरिक फेरफटका मारण्यासाठी गेले असताना सागर दरेकर यांना येथील झाडांमध्ये काही वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाहणी केली असता त्यांना झाडाला एका इसमाचा मृतदेह लटकत असल्याचे दिसून आले, याबाबत सागर दरेकर यांनी सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांना माहिती दिली, त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता अंगात पांढरा शर्ट व तोंडावर मास्क बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा कुझलेल्या अवस्थेतील मृतदेह त्या ठिकाणी मिळून आला आहे, तर सदर इसमा बाबत काहीही माहिती मिळू शकली नसून याबाबत सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय ज्ञानेश्वर माने रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय ढावरे हे करत आहे.