अन् पोलीस आयुक्त पत्रकारांवरच भडकले

तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कोणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का ? असा सवाल त्यांनी केला.

    एरवी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांना सौजन्याने आणि दिलखुलासपणे उत्तर देणारे पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आज पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. गोळीबार हा पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झाले का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पोलीस आयुक्त चांगलेच भडकले. तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कोणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच मी जे बोलतो तेच करतो, कोणाचाही दबाव मी घेत नाही. गुन्हा करणाऱ्यांवर मी कारवाई करतोच, असा दावाही त्यांनी केला.