संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या दारातच विवाहित मुलीवर केले अंत्यसंस्कार ; सासरच्या लोकांनीच मुलीला मारल्याचा आरोप , पोलिसांच्या बंदोबस्तात देहाला दिला अग्नी

विष प्राशन करून उपचारांदरम्यान गीतांनजलीचा मृत्यू झाल्या नंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. विष प्राशन केल्या नंतर संतापलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी देखील या घटने नंतर बारामतीच्या खासगी रुग्णालयात एकच गोंधळ घातला होता. पुढील अनर्थ टाळण्यासाठी दोन दिवस बारामती ग्रामीण पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात केला होता.

    बारामती : सासरच्य छळास कंटाळून आत्महत्या केलेल्या गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या दारातच अंत्यसंस्कार सांगवी (ता.बारामती)येथे घडली.

    दोन दिवसांपूर्वी गितांजली अभिषेक तावरे या विवाहितेने विष प्राशन केले होते, तिच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (२७ रोजी ) उपचारा दरम्यान मृत्यू झाल्या नंतर ससून रुग्णालयातून मृतदेह सांगवी येथे सासरच्या दारात आणला. माहेरकडील नातेवाईकांनी अंत्यसंस्कार प्रसंगी गोंधळ घातल्याने पोलिसांसमोर मोठा ताण निर्माण झाला होता. बारामती तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात केला होता. पुढे गावातील काही अनर्थ घडून येऊ न देण्यासाठी गावातील काही लोकांनी, व सासरकडील लोकांनी दारात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

    वारंवार सोने व पैसे आणण्याची मागणी केल्यावर वर्षभरात १५ लाख रूपये व २५ तोळे सोने व इतर सर्व गोष्टीची पूर्तता करून देखील पुन्हा मृत गीतांजलीकडे तगादा लावला होता. मात्र, यावेळी ५० तोळे सोन्याची मागणी पूर्ण न झाल्याने आमच्या मुलीला सासरच्या लोकांनीच विष पाजून, इंजेक्शन देऊन मारल्याचा खळबळजनक आरोप मृत महिलेची चुलती नमिता अरुण यादव (रा.गूरसाळे ता.माळशिरस ) व नातेवाईकांनी केला आहे.

    विष प्राशन करून उपचारांदरम्यान गीतांनजलीचा मृत्यू झाल्या नंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. विष प्राशन केल्या नंतर संतापलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी देखील या घटने नंतर बारामतीच्या खासगी रुग्णालयात एकच गोंधळ घातला होता. पुढील अनर्थ टाळण्यासाठी दोन दिवस बारामती ग्रामीण पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात केला होता. गुरुवारी ( रात्री सुमारे १ वाजेपर्यंत ) पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला होता. मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत या घटनेबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.