बोल्हाई वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी आण्णासाहेब शिंदे बिनविरोध

वाघोली  : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथील बोल्हाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बोल्हाई देवी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार आण्णासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड पार पडली.तर याच सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी रामराव थोरात यांनी निवड पार पडली.ही सोसायटीची बिनविरोध निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी माळवदकर यांच्या प्रशासकीय अधिकाराखाली तर पीडिसीसी बँकेचे संचालक जेष्ठ नेते माणिकराव गोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नवनिर्वाचित चेअरमन आण्णासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमन रामराव थोरात यांचा निवडीनंतर सत्कार पीडिसीसी बँकेचे संचालक जेष्ठ नेते माणिकराव गोते,वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच संजयराव भोरडे पाटील,सिरसवडीचे माजी सरपंच संदिप गोते यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी जेष्ठ नेते बापूसाहेब भोर,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय चव्हाण,गावडेवाडी सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे,शिवाजी इंगळे,माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गावडे,माजी उपसरपंच तुकाराम शिंदे,प्रसिद्ध उद्योजक प्रदिप शिंदे,शिवसेनेचे माऊली ढवळे,ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड,गोपीनाथ भोरडे,अलका गायकवाड,सुरेखा चव्हाण,विश्वनाथ चव्हाण,आदी सोसायटीचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्या बोल्हाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालकांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल संचालकांचे आभार मानतो.यापुढे सोसायटीच्या सर्व संचालकांना विश्वासात,एकत्र घेऊन आम्ही शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.तर सोसायटीच्या प्रगतीच्या व विकासाच्या दृष्टीने यापुढे कामे करू.

-आण्णासाहेब शिंदे,नवनिर्वाचित चेअरमन-बोल्हाई वि.का.स.सोसायटी वाडेबोल्हाई

बोल्हाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ नेते माणिकराव गोते यांच्यासह आदी संचालक व विविध पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.