कवठे येमाईत आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह ;परिसरात खळबळ

कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिम भागातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात यापूर्वी मुंबईवरून आलेले ४ पैकी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ३ जण निगेटिव्ह होऊन गावात नुकतेच परतलेले

कवठे येमाई :  शिरूरच्या पश्चिम भागातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात यापूर्वी मुंबईवरून आलेले ४ पैकी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ३ जण निगेटिव्ह होऊन गावात नुकतेच परतलेले असताना ससुन रुग्णालयात काम करणा-या येथील ३० वर्षीय महीलेचा रिपोर्ट कोरोनापॉझिटीव्ह आला असल्याची माहीती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिली.    दरम्यान ही महीला व तिचे कुटुंबीय कवठे येमाई,सविंदणे व परिसरात अनेक जणांच्या संपर्कात आल्याने नागरीकांमध्ये मोठीच भीती पसरली आहे.या बाबतची  माहिती स्थानिक प्रशासनास मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमणी,कामगार तलाठी सर्फराज देशमुख, सरपंच अरूण मुंजाळ, सविंदणे चे सरपंच संतोष मिंडे,दीपक रत्नपारखी यांनी तात्काळ तेथे भेट दिली असून सदर महिला व तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ६० व्यक्तिंचा शोध सूरू करण्यात आला आहे. संपर्कात असलेल्या कवठे गावठाणातील २ जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तलाठी देशमुख व ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिली. तर त्या कुटुंबियांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या ४ मुले व ५ मोठी माणसे यांची उद्या तात्काळ स्व्याब तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ.कट्टीमनी यांनी सांगितले. कवठे यमाई,सविंदणे,इचकेवाडी  परिसरातील नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान डॉ. कटटीमणी यांनी केले आहे.

 मागील १५ दिवसांपूर्वी येथे संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या ३ जणांची कोरोना तपासणी काल निगेटिव्ह आल्याने व ठणठणीत बरे असल्याने आज ग्रामस्थांना हायसे वाटले असताना आज आणखी एक महिला गावात आज  कोरोना पँझीटीव्ह असल्याचे समजल्याने खळबळ उडाली आहे.नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे व प्रशासनाने केले आहे.