वेल्हयात आणखी एक नवा कोरोनाबाधित रूग्ण.

भोर : वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे येथे शनिवारी दुपारी अडतीस वर्षाचा नवीन कोरोना बाधीत रूग्ण सापडला आहे.त्याच्यावर पुणे येथे खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र

भोर  : वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे येथे शनिवारी दुपारी अडतीस वर्षाचा नवीन कोरोना बाधीत रूग्ण सापडला आहे.त्याच्यावर पुणे येथे खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगीतले.यापूर्वी नउ रूग्ण बरे होउन घरी आले आल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. आजच्या नवीन रूग्ण सापडल्याने प्रशासनासमोर पुन्हा आव्हान उभे राहीले आहे.त्याच्या कुटुंबातील सात जणांना तातडीने तपासणीसाठी पुण्यात नेले आहे.तसेच संपर्कात आलेल्यांची माहीती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी  डॉ.सुदर्शन मलाजूरे यानी सांगीतले.खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सुरवड,सोंडे माथना,सोंडे कार्ला,कोदवडीक्षेत्र प्रतिबंधीत तर सोंडे सर्फाला,सोंडे हिरोजी,आसनी दामगुडा,आसनी मंजाई क्षेत्र बफर झोन घोषीत केले आहे.या दोन्ही परीसरांतील नागरिकांची घरोघर आरोग्य तपासणी करणार असल्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे  यांनी सांगीतले.