बारामती शहरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटीजन तपासणी ; १८० जणांची तपासणी, सर्व रिपोर्ट ‌ निगेटिव्ह

बारामती शहरात रस्त्यावरून फिरणार्‍या नागरिकांची पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने कोरोना तपासणी केली.१८० पैकी १८० जणांचे रिपोर्ट या तपासणीत निगेटिव्ह आले. बारामती शहरातील सम्यक चौक, इंदापूर चौक या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी, व खराडेवाडी याठिकाणी कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    बारामती: बारामती शहरातील लॉकडाऊन शिथिल केल्यनंतर बारामती शहरात नागरीकांची गर्दी वाढली आहे,या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिस ठाण्याच्य वतीने वैद्यकीय विभागाच्या मदतीने रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. दिवसभरात १८० जणांची तपासणी करण्यात आली, सुदैवाने या सर्वांचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

    बारामती शहर व तालुक्यात लॉकडाऊन शिथील ‌ करण्यात आल्याने नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेच्या वतीने गुरुवारपासून (दि १०) बाजारपेठेतील व्यापारी व त्यांच्या कामगारांची कोरोना तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ९६ जणांची तपासणी करण्यात आली, त्या ९६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी (दि ११) १०० व्यापारी व कामगार यांची तपासणी करण्यात आली, या तपासणीत सर्व रिपोर्ट निगेटिव आले.

    बारामती शहरात रस्त्यावरून फिरणार्‍या नागरिकांची पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने कोरोना तपासणी केली.१८० पैकी १८० जणांचे रिपोर्ट या तपासणीत निगेटिव्ह आले. बारामती शहरातील सम्यक चौक, इंदापूर चौक या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी, व खराडेवाडी याठिकाणी कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.याठिकाणी २४३ जणांची अँटीजन करण्यात आली. यामध्ये २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.