Anything can happen in Pune! Also picked up a direct biker with the bike; Photos then video now viral

नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी असल्याने ती उचलण्यात येत होती. पण, दुचाकी चालक पळत आला आणि तो थेट दुचाकीवर बसला. त्यानं बाईक उचलण्यास विरोध केला. पण, कारवाईला मागे हटतील ते पुणे पोलीस कसले. त्यांनी बाईक त्या चालकासह उचलली आणि थेट व्हॅनवर ठेवली. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतत आता व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

    पुणे : पुणे RTO ने केलेल्या एका कारवाईचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. या नंतर या कारावाईचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. RTO ने कारावाई करताना बाईकसोबत डायरेक्ट बाईकवाल्याला पण उचललं आहे.

    नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी असल्याने ती उचलण्यात येत होती. पण, दुचाकी चालक पळत आला आणि तो थेट दुचाकीवर बसला. त्यानं बाईक उचलण्यास विरोध केला. पण, कारवाईला मागे हटतील ते पुणे पोलीस कसले. त्यांनी बाईक त्या चालकासह उचलली आणि थेट व्हॅनवर ठेवली. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतत आता व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

    ही कारवाई पाहण्यासाठी येथे मोठा घोळकाच जमा झाला होता. त्यानंतर काही तास गोंधळ सुरू होता. तो व्यक्ती व्हॅनवर बसूनच वाहतूक पोलिसांशी बोलत होता. बराच वेळ हा वाद सुरु होता. मात्र या कारवाई मुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

    पुण्यात बाईकसोबत डायरेक्ट बाईकवाल्याला पण उचललं – पाहा व्हिडिओ