अपॉइंटमेंट घेऊनच ‘आरटीओ’ मध्ये येण्याचे आवाहन

नागरिकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरुन अपॉइंटमेंट घ्यावी.शासनाच्या निर्देशानुसार कामकाज सुरु आहे.गर्दी टाळण्यासाठी आणि कामकाज सुरळीत होण्यासाठी नियमांचे पालन करावे.त्यानुसार कार्यालयात यावे.असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

    पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या ओटोक्यात आल्यानंतर वाहन नोंदणी, हस्तांतरण, परवान्यासह विविध कामांसाठी आरटीओ खुले झाले आहे.मात्र, गर्दी टाळण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मर्यादित स्वरुपात कामकाज सुरु करण्यात आले आहे.

    गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे नागरिकांची आरटीओमधील कामे खोळंबली आहेत.वाहन परवाना, नोंदणी, हस्तांतरण, परवान्याची मुदत संपणे, एनओसी यासह विविध कामे प्रलंबित आहेत.पुन्हा कार्यालय सुरु झाल्याने या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

    दीड महिन्यापासून बंद असलेल्या कार्यालयात अचानक गर्दी वाढू शकते, यासाठी परिवहन विभागाकडून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.कामकाजाची विभागणी करुन तसा कोटा निश्चित करण्यात आला आहे.कार्यालयात कोरोना नियामवलीच्या शासन निर्देशानुसार मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.

    संकेतस्थळावरुन घ्यावी लागणार अपॉइंटमेंट

    नागरिकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरुन अपॉइंटमेंट घ्यावी.शासनाच्या निर्देशानुसार कामकाज सुरु आहे.गर्दी टाळण्यासाठी आणि कामकाज सुरळीत होण्यासाठी नियमांचे पालन करावे.त्यानुसार कार्यालयात यावे.असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.अपॉइंटमेंट परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सव्र्हिसेसवर क्लिक करावे.त्यानंतर लायसन्स आणि वाहनसंबंधित याच्यापैकी आवश्यक पर्याय निवडावा.त्यानंतर संबंधित कामासाठी अपॉइंटमेंट घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.