आरक्षण त्वरित लागू करा ; जुन्नर तालुका मराठा समाजाची मागणी

जुन्नर: महाराष्ट्रातील मराठा समाज शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाला मुकलेला असून त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. सारथी संस्थेमधील विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी किमान ५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी. तसेच त्वरित आरक्षण लागू करणे व अन्य मागण्यांबाबतचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जुन्नरचे तालुका अध्यक्ष शिवश्री रुपेश जगताप, शहर अध्यक्ष शिवश्री मंदार बुट्टे, पुणे जिल्हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड पूर्व विभाग कार्याध्यक्ष आरती ढोबळे, जिजाऊ ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्ष ज्योत्स्ना महाबरे, किरण जुंद्रे, संतोष जाधव, सिद्धेश ढोले, दीपक वाळुंज, नरेंद्र कासार, मंदार ढोबळे उपस्थित होते. मराठा समाजाच्या मागण्यां संदर्भातील निर्णय राज्य शासनाने तातडीने घेवून आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल व त्यानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीस राज्य शासन पूर्णतः जबाबदार राहिल, असेही निवेदनात म्हटले आहे.