राज्य माथाडी सल्लागार समितीवर कामगार नेते इरफान सय्यद यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत शासनाचे उपसचिव डॉ. श्री ल पुलकुंडवार यांनी पत्राद्वारे कामगार आयुक्तांना पत्राद्वारे सांगितले आहे.

पिंपरी: महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये मालकांचे आठ प्रतिनिधी आणि कामगारांचे आठ प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील कामगार नेते इरफान सय्यद यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबत शासनाचे उपसचिव डॉ. श्री ल पुलकुंडवार यांनी पत्राद्वारे कामगार आयुक्तांना पत्राद्वारे सांगितले आहे. या समितीमध्ये एकूण १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आठ सदस्य हे मालकांचे प्रतिनिधित्व करतात. तर आठ सदस्य हे कामगारांचे प्रतिनिधित्व करतात.  कामगारांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून डॉ. बाबा आढाव, इरफान सय्यद यांच्यासह आठ जणांची निवड करण्यात आली आहे. कामगार नेते इरफान सय्यद यांच्या निवडीमुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

नवीन सल्लागार समितीमधील मालकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य –

प्रशांत गिरबाने (एमसीसीआयए, पुणे),शिवनारायण बद्रीनारायण सोमाणी (नाशिक), रामचंद्र नीलकंठ भोगले (औरंगाबाद), एन एल गुप्ता (बीजीटीए मुंबई),
अमृतलाल जिसुलाल जैन (ग्रोमा. मुंबई), संजय के अग्रवाल (नागपूर), सुदेश एन शेट्टी (मुंबई), दत्तात्रय सर्जेराव ढमाळ (सातारा)

नवीन सल्लागार समितीमधील कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य –

डॉ. बाबा आढाव, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, गुलाबराव गणपतराव जगताप,दिलीप जगताप, राजकुमार घायाळ, इरफान खुर्शीद सय्यद, संतोष शामराव शिंदे
सुभाष लोमटे