वाकड पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती आणि भरोसा सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी : वाकड पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि.१०) महिला दक्षता समिती आणि भरोसा सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बिरादार, वाकडचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक सपना देवतळे, पोलिस उपनिरिक्षक संगीता गोडे यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना सहाय्यक पोलिस निरिक्षक सपना देवतळे म्हणाल्या, भरोसा सेलमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास अजून वाढणार आहे. महिला न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे येतील. पोलिसांना दक्षता समितीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचण्यास मदत होईल. गुन्हेगारी कमी करण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल.

सुशिक्षित महिला पुढे आल्या तर समाज्यातील इतर महिलांना प्रोत्साहन मिळेल, असे उद्गार सपना देवतळे यांनी यावेळी काढले. महिला दक्षता समिती आणि भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक वाद आणि कलह समुपदेशन करून सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही देवतळे यावेळी म्हणाल्या.

वुमेन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी भरोसा सेल आणि दक्षता समितीच्या महिलांचे स्वागत केले. एकत्र मिळून काम केल्यास महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी समुपदेशक तेजस्विनी डोमसे, अनघा घाटोळे, शिल्पा आणपन, प्रज्ञा हत्नालिकर, श्रुती सोनवणे, कीर्ती घार्गे, अनिता तुतारे, दीपा कुलकर्णी, अर्चना भालेराव, सुजाता नखाते, शारदा चोकशी, रुपाली दळवी आणि इतर महिला उपस्थित होत्या.