कोरोना रूग्ण आढळलेल्या गावांत सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती

जितेंद्र डुडी यांची माहिती

जितेंद्र डुडी यांची माहिती                                                                                                                                                                       

भिमाशंकर: आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या आठ गावांतील प्रतिबंधित क्षेत्र पुर्णतः बंद करण्यात आले असून या ठिकाणी कोरोना सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.    

साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी-कोटमदरा, गिरवली व वळती या आठ गावांमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. आता या गावांमध्ये कोरोना सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये साकोरे येथे ७ सर्व्हेक्षण टीम, शिनोली येथे १६, निरगुडसर येथे ३७, जवळे ५, वडगाव काशिंबेग १६, पिंगळवाडी -कोटमदरा १५, गिरवली ११ व वळती २३ असे एकंदरीत १२८ सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन यामध्ये १७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणामध्ये २४ हजार ६९५ लोकसंख्या असलेल्या ४ हजार ९८७ कुटुंबांचे सर्व्हेक्षण सुरू असून, त्यापैकी कोमॉरबिड एकुण १ हजार २४१ व ६० वर्षावरील ३ हजार ७४६ व्यक्ती आहे. यांचेही दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच हाय रिक्स व लो रिक्स मधील व्यक्तींची यादी व प्रश्नावली तयार करणेत आली असून त्याप्रमाणे सर्व्हेक्षण व संबंधित संपर्क व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत आहे.